Home विश्वकोश कार्याची माहिती
कार्याची माहिती
विश्वकोश कार्याची माहितीमराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी राज्य शासनाने दिनांक १९ नोव्हेंबर, १९६० रोजी कै. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली. कामाचा वाढता व्याप विचारात घेता दि. १ डिसेंबर, १९८० रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे विभाजन होऊन मराठी विश्वकोशाच्या संपादन व प्रकाशन कार्यार्थ स्वतंत्र मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. ख्यातनाम एन्साक्लोपिडिया ब्रिटानिकाच्या धर्तीवर मराठी विश्वकोशाचे संपादन मंडळाचे मराठी विश्वकोश कार्यालय, वाई, जि. सातारा येथे चालू आहे. एकूण २३ खंडात प्रकाशित व्हावयाच्या मराठी विश्वकोश आतापर्यंत १ ते १८ खंड प्रकाशित झाले असून उर्वरित खंडाचे संपादन व प्रकाशन चालू आहे. 

१. मुलांचा विश्वकोश
मंडळाच्या वाड्मयीन कार्याचाच भाग म्हणून मराठी विश्वकोशाच्या संपादन व प्रकाशन कामाबरोबरच मानव्यविद्या तसेच विज्ञान व तंत्रविद्या या विषयांतील ज्ञान सोप्या व सुटसुटीत भाषेत जरूर तेथे सुटसुटीत आकृत्या, आलेख व भरपूर चित्रासंह मुलांना उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने 'बालविश्वकोश' व 'कुमारविश्वकोश' अशा दोन भागात 'मुलांचा विश्वकोश' संपादित करण्याची योजनाही मंडळाने हाती घेतली असून कुमार विश्वकोश खंड २- जीवसृष्टी आणि पर्यावरण (भाग १) प्रकाशित झाला असून कुमारविश्वकोश खंड ११ चे संपादन व प्रकाशन करण्याचे काम प्राधान्याने सुरु केले आहे.

२. मराठी विश्वकोश खंड १ ते १७ ची सीडी 
मराठी विश्वकोश हा सर्वविषयसंग्राहक ज्ञानकोश असून त्याचे आतापर्यंत १ ते १८ खंड प्रकाशित झाले आहेत. त्यापैकी १ ते १४ खंडांच्या प्रती संपल्याने वाचकांची दीर्घ कालाची मोठी मागणी विचारात घेऊन ज्ञानार्जन व लोकशिक्षणाच्या उद्देशाने सीडी स्वरुपात हे खंड वाचकांना मिळावेत. तंत्रप्रवण युगाशी संगती राखावी म्हणून मंडळाने प्रकाशित १ ते १७ खंडांमधील माहिती सहा सीडींच्या संचामध्ये उपलब्ध करुन दिली आहे. ई बुक स्वरुपात असलेल्या या महासीडीमध्ये २०,१८२ पृष्ठे आणि ९५२ चित्रपत्रे समाविष्ट केली आहेत. 

३. बोलका विश्वकोश
मराठी विश्वकोश हा बोजड, किचकट आहे, तो केवळ उच्चशिक्षित लोकांकरिताच आहे, हा गैरसमज दूर व्हावा, तो कपाटात न राहता लोकाभिमुख व्हावा, विश्वात यावा त्याचा लोकांनी वापर करावा या प्रयत्नाचा एक भाग म्हणून मंडळातर्फे अंधांकरिता तसेच वयोवृद्धांसाठी अथवा वाचन ताण कमी करण्याकरिता प्रायोगिक स्वरुपाचा बोलका विश्वकोश तयार करण्यात आला आहे. 

४. मराठी विश्वकोश खंडांचे पुनर्मद्रण
मंडळातर्फे प्रकाशित झालेल्या १ ते १८ खंडांपैकी प्रत्येकी सुमारे १०,००० प्रती संपल्या असून खंडाच्या प्रतीसाठी ग्राहाकांकडून येणारी मोठ्या प्रमाणावरील मागणी विचारात घेता, खंडांचे क्रमश: पुनर्मुद्रण करण्यात येत आहे. खंड १ ते ३ व ५ च्या पुनर्मुद्रित प्रती विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. खंड ४ व ६ ते १३ पुनर्मुद्रणासाठी शासकीय मुद्रणालयाकडे सोपविण्यात आले आहेत. 

५. महाराष्ट्र कन्या चरित्रकोश 
मंडळाच्या वतीने प्रकाशित होत असलेला मुलांचा विश्वकोशामध्ये कुमारविश्वकोशांतर्गत शासनाच्या महिला सबलीकरणाच्या धोरणास अनुसरुन कला, साहित्य, संगीत, पत्रकारिता, समाजसेवा आणि क्रीडा या तसेच इतरही विविध क्षेत्रातील नामवंत कर्तबगार महाराष्ट्र कन्यांची प्रेरणादायी चरित्रात्मक माहिती असलेला महाराष्ट्र कन्या चरित्रकोश मंडळाच्या वतीने प्रकाशित करण्यात येत आहे. सध्या कन्या चरित्रकोश भाग १ चे संपादन सुरु आहे.

 ६. मराठी विश्वकोशाचे संगणकीकरण
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मराठी विश्वकोशाला आंतरराष्ट्रीय स्थान मिळवून तो इंटरनेटवर (महाजालकावर) आणण्याच्या दृष्टीने www.vishwakosh.org.in या वेबसाईटवर जगभरच्या मराठी वाचकांसाठी १ ते १७ खंडांची सर्व नोंदसूची उपलब्ध करण्यात आली आहेत. जगातील सर्व मराठी भाषिकांना मराठी विश्वकोशातील माहिती उपलब्ध करुन देण्याचे कार्य मंडळामार्फत भारत सरकारच्या सी-डॅक पुणे या संस्थेच्या सहकार्याने करण्यात येत असून सद्या मराठी विश्वकोशाचा खंड १ ते ८ युनिकोडद्वारे महाजालकावर सर्व वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आला असून उर्वरित खंड माहे डिसेंबर २०१२ पर्यंत क्रमाक्रमाने युनिकोडद्वारे महाजालकावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

७. विश्वकोश राजस्पर्धा व प्रश्न मंजुषा स्पर्धा
 ज्या लोकशिक्षणाच्या उद्देशाने शासनाने मराठी विश्वकोश रचना हाती घेतली तो हेतू सफल व्हावा, मराठी विश्वकोशाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, शासनाच्या या प्रकाशनाची जनतेस माहिती व्हावी यादृष्टीने महाराष्ट्रभर ठिकठिकाणी विश्वकोश व प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केल्या जातात. वाचन चळवळीचा एक भाग व विश्वकोशाचे परिशीलन आणि प्रचार यासाठी दूरदर्शनवरही विश्वकोश महा राजस्पर्धा प्रसारित करण्यात येत आहे.

मराठी विश्वकोश खंडांची विक्री व्यवस्थामराठी विश्वकोशाची सर्व प्रकाशने महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ व शासकीय मुद्रणालयाच्या सर्व विक्री केंद्रात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 
मंडळाची प्रकाशने आणि त्यांची किमंत 
मराठी विश्वकोश खंड १ ते ३, ५ आणि १४ ते १८ - सुट वजा जाता प्रत्येकी........... रुपये १७५/-
मराठी विश्वकोश खंड १ ते १७ च्या ६ सीडींचा संच................. रुपये ७००/-
कुमार विश्वकोश परिचय ग्रंथ आणि सीडी................................ रुपये १०५/-
बोलका विश्वकोश ऑडिओ सीडी ( अंधांसाठी).......................... रुपये १००/-

प्रस्तावित योजना
मराठी विश्वकोश खंड १९ ते २३ चे प्रकाशनखंड १ ते १८ अद्यावतीकरण व पुरवणी खंडाचे संपादन/प्रकाशनकुमार विश्वकोश, बालविश्वकोश प्रत्येकी १२ खंडांचे संपादन/प्रकाशन